📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवळा तालुक्यात रस्ता कामांचा शुभारंभ

      *प्रतिनिधी देवळा: ज्ञानेश्वर आढाव*
         देवळा: काल देवळा तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
        त्यात जनजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन खुंटेवाडी येथे करण्यात आले. 
       तसेच तालुक्यातील पिंपळगाव - खडकतळे - देवपुरपाडे या रस्त्याच्या सुधारणा कामांचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल आहेर व भाजपा जिल्हाध्यक्ष मा. केदा नाना आहेर यांच्या हस्ते खडकतळे चौफुलीवर मंगळवारी दहा तारखेला करण्यात आला. रस्ते कामामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाला चालना मिळेल.यामुळे या गावांसह वासोळपाडे , महालपाटणे , मेशी, देवपुरपाडे या गावांची सोय होणार आहे. 
       यावेळी पंचायत समिती माजी सभापती केदा शिरसाठ, शिवसेना तालुकाप्रमुख बापु जाधव, माजी सरपंच नामदेव भामरे, पोपट पगार, मालजी सूर्यवंशी ,रवींद्र शिंदे ,ह भ प पुंडलिक महाराज, दयाराम पगार ,सोसायटीचे माजी चेअरमन अजित भामरे ,शरद सूर्यवंशी ,ताराचंद बागुल, पोलीस पाटील हेमंत पगार, देवपुरपाडे सोसायटीचे चेअरमन अभिमान अहिरे, खंडू शेवाळे, कौतिक बागुल , जालिंदर शेवाळे, कैलास खैरनार ,सुनील चव्हाण ,देवपूर पाडे ग्रामपंचायत सदस्य अजय अहिरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने