📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव व परिसरात उल्का सदृश्य चकाकणाऱ्या ताऱ्यांचे दर्शन: व्हिडिओ बघा

मालेगाव (योगेश पगारे) मालेगाव तथा नामपूर परिसरातून उल्कावर्षाव सदृश्य चकाकणाऱ्या ताऱ्यांचे दर्शन झाले असून आज दि. (2) रात्री आठ वाजेच्या सुमारास आकाशात तीन उल्का पडतांना नागरिकांनी अनुभवले, 
मालेगाव शहरातील जॉगिंग ट्रॅकच्या उद्घाटनाच्या आतिशबाजी मध्ये बऱ्याच जणांची सुरुवातीला गफलत झाली, काहींना ते विमान असल्याचे वाटले,  परंतु नामपुर व परिसरातूनही नागरिकांनाही या उल्का दिसल्यामुळे सोशल मीडियावर याची चांगली चर्चा आहे व व्हिडिओज सुद्धा व्हायरल होत आहेत, 
खगोल शास्त्रज्ञ याची पुष्टी करेपर्यंत हे काय होते हे सांगणे कठीण असले तरी बऱ्याच लोकांनी अनुभवल्या प्रमाणे या उल्काच असल्याचे सांगितले जात आहे.


उल्कापात म्हणजे काय?
अवकाशात भ्रमण करणाऱ्या खगोलीय दगड गोळ्यांना उल्का (meteor)असे म्हणतात. आणि याच उल्का पृथ्वीवर येऊन आदळल्या तर त्याला उल्कापात (meteoroid) म्हणतात

२.उल्का आणि तारे दोन्ही भिन्न गोष्टी आहेत का?

हो , उल्का आणि तारा या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उल्का या फक्त अवकाशातील दगड आहेत. तारे ही फार वेगळी गोष्ट आहे . सूर्य हा एक तारा आहे.एका तारामालेत एकच तारा असतो परंतु उल्का असंख्य असतात. तारा हा स्थिर व स्वयंप्रकाशित असतो
दररोज एखादी तरी उल्का जमिनीवर पोहचते असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.परंतु ते आकाराने खूपच लहान असतात त्यामुळे आपल्याला ते ज्ञात होत नाही. अवकाशातून पृथ्वीवर येताना उल्केचा वातावरणाशी घर्षण होऊन प्रकाश निर्माण होतो ..त्या उष्णतेने वितळतात व त्यांचे बाष्पीभवन होऊन वातावरणातच नष्ट होऊन जातात.
कशा दिसतात उल्का?

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने