📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जे ए टी महिला महाविद्यालयात नॅशनल वेबिनार

 (मालेगाव) मालेगाव येथील जे ए टी महिला महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभाग आणि आय क्यू ए सी यांच्या संयुक्त विद्यमाने फिजिकल फिटनेस ॲड योगा या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रा चे आयोजन करण्यात आले होते. गुगल प्लॅटफॉर्म द्वारा आयोजित सदर ऑनलाइन चर्चासत्रात नामपूर महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. सुरेखा दफ्तरे आणि मालेगावातील प्रसिद्ध आरोग्य तज्ञ डॉ. रिता मर्चंट यांनी मार्गदर्शन केले . चर्चासत्राचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान यांनी केले. महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय समन्वयक डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांचे स्वागत केले . शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. सुनीता देसले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुरेखा दप्तरे यांनी योग आणि निरामय आरोग्य याचा अतिशय जवळचा संबंध आहे असे प्रतिपादन केले आणि यासाठी योग आवर्जून करावा असे आवाहन केले . वेबिनारच्या द्वितीय सत्रात डॉ. रिटा मर्चंट यांनी विद्यार्थिनींना आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान दिले .संपूर्ण शरीराची कशाप्रकारे स्वच्छता ठेवावी याविषयी बहुमुल्य मार्गदर्शन केले .सदर वेबिनार चे सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी केले .सदर वेबिनार च्या यशस्वीतेसाठी प्रा. नवीद अख्तर, सीनियर कलर्क मोमिन अब्दुल हसिब, कु मनताशा , कु. नुरुसबाह इत्यादींनी केले प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी उपस्थितांचे आभार मानल्यावर वेबिनारची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने