📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

के. बी. एच विद्यालयाचा निनाद खैरनार शालेय स्पर्धा परीक्षेत राज्यात द्वितीय


       भारती विद्यापीठ पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शालेय स्पर्धा परीक्षेत के. बी. एच विद्यालय मालेगाव कॅम्प येथील विद्यार्थी निनाद हेमंत खैरनार यांने राज्यातून इयत्ता नववी मध्ये द्वितीय क्रमांकाचे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. निनाद खैरनार ला पंधराशे रुपये रोख , प्रमाणपत्र, गुलाब पुष्प कंपास पेटी देऊन सन्मानित करण्यात आले. भारती विद्यापीठाच्या शालेय स्पर्धा परीक्षेत के.बी.एच.विद्यालयाने 
घवघवीत यश संपादन केले आहे.
           विद्यालयाच्या वतीने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवलेला गुणवंत विद्यार्थी निनाद खैरनार याचा विद्यालयाचे प्राचार्य प्रवीण पाटील (आबासाहेब), उपप्राचार्य राजेंद्र पाटील, उपप्राचार्य रवींद्र शिरुडे , पर्यवेक्षक नितीन गवळी, पर्यवेक्षक संजीव महाले, पर्यवेक्षक संजय शिंदे,स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख राजेश धनवट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
       विद्यालयातील इतर गुणवंत विद्यार्थी इयत्ता नववी विद्यालयात द्वितीय क्रमांक वेदांत प्रवीण नेरकर, तृतीय क्रमांक यज्ञेश पवार यांनी पटकावला. इयत्ता आठवी मध्ये विद्यालयात प्रथम क्रमांक वेदांत निकम , द्वितीय क्रमांक गंधर्व पवार, तृतीय क्रमांक कृष्णा शेवाळे यांनी पटकावला. इयत्ता दहावी मध्ये रितेश चव्हाण याने प्रथम क्रमांक पटकावला. भारती विद्यापीठ पुणे शालेय स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख राजेश धनवट यांनी स्पर्धेचे कामकाज बघितले.
        

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने