एसटीचे कर्मचारी कित्येक दिवसांपासून संपावर आहेत. आज विलीनिकरणाच्या मागणीवर मुंबई हाय कोर्टाच्या समितीने महत्वपूर्ण अहवाल दिला आहे. यावर राज्य मंत्रिमंडळात अहवालावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाच्या त्रिसदस्यी समितीने हा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार एसटीचे विलीनीकरण शक्य नसल्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
दरम्यान, मध्यंतरी न्यायालयाने एसटीच्या विलिनीकरणाच्या निर्णयासंदर्भात राज्य सरकारला त्रिसदस्यीय समिती नेमण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार समितीची स्थापना करण्यात आली. त्या समितीने आज आपला अहवाल सादर केला होता. आता संप अजूनही संपूर्ण मिटला नसला तरीपण यामुळे एसटी कर्मचारी आणि राज्य सरकार यावर आणखी काही पुढील भूमिका मांडणार का, याकडे लक्ष लागणार आहे