📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवळा भावडबारी घाटात ट्रक पलटी, एका कामगाराचा मृत्यू

राकेश आहेर | देवळा

   देवळा येथील एस. के. डी शाळेच्या समोर भावडबारीघाटात सोग्रसहुन ए.व्ही बॉयलर या कंपनिच्या पोल्ट्री फार्मच्या फिडच्या गोणी घेऊन देवळ्याच्या दिशेने येणारा ट्रक क्रमांक (एम.एच १८, ए.ए. ०३९९) हा ट्रक  पलटी झाल्याने एका कामगाराचा त्यात मृत्यू झाला आहे.  ट्रक भरधाव वेगात असतांना वळणावर हा अपघात झाला असून या अपघातात जितन भानू सहा ( वय ४० )  हा बिहार राज्यातील मजूर होता. तो अपघातात ट्रकखाली दाबला गेला होता त्यातचं त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी  देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  दिलीप लांडगे, पोलीस नाईक निलेश सावकार, पोलीस मोरे दाखल झाले होते. स्थानिकांच्या मदतीने पोलीसांनी त्या मजुराचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास देवळा पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने