मालेगाव ( राजेश धनवट ) के. बी. एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथे इयत्ता १०वी बोर्डाची परीक्षेस आजपासून प्रारंभ झाला. लाॅकडाऊन नंतर प्रथमच परीक्षा झाल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक सगळ्यांनाच परीक्षा संदर्भात उत्सुकता होती. आज मराठीच्या पेपरने दहावीच्या परीक्षेचा प्रारंभ सुरळीतपणे सुरू झाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला. के. बी. एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथील ८४२पैकी ८३८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले ४ विद्यार्थी गैरहजर होते. परीक्षा सुरू होण्यापूर्वी संपूर्ण शाळा सॅनेटाईज करण्यात आली त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान तपासूनच व हातावर सॅनेटाइज मारून मास्क घातलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता.
प्रांतधिकारी विजयानंद शर्मा यांनी परीक्षा केंद्रास भेट दिली असता परीक्षा शांततेत व सुरळीत सुरू असल्याने समाधान व्यक्त केले. त्यांच्या समवेत समन्वयक प्रवीण खैरनार उपस्थित होते.
केंद्र संचालक प्राचार्य प्रविण पाटील उपकेंद्र संचालक म्हणून राजेंद्र पाटील यांनी कामकाज बघितले.
परीक्षा सुरळीत होणे कामी पर्यवेक्षक नितीन गवळी, संजीव महाले, संजय शिंदे , संजय सूर्यवंशी,स्टेशनरी सुपरवायझर एम. आर.आहिरे,आर. डी शेवाळे ,डी.के.सोनजे,के.वाय. देवरे, शशिकांत पवार, दक्षता समितीचे राजेश धनवट यांचे सहकार्य लाभले. शाळेतील व्यवस्थेबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले.