विजेचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यू..
आजेसासूच्या अंत्यसंस्कार आटोपून आल्यावर घरी कपडे वाळत घालत असताना घडला प्रकार..
एकाच कुटुंबातील दोघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ..
मालेगाव (मनोहर शेवाळे) :- आजेसासुचा अंत्यविधी आटोपून घरी कपडे वाळत घालत असतांना नातसुनाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना नाशिकच्या देवळा तालुक्यातील सावकी गावात समोर आली आहे. आकांक्षा कचवे असे मृत्यू झालेल्या सुनेचे नाव आहे.आजल सासू सुलकनबाई कचवे यांचा काल मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यविधी आटोपून घरी परतल्यानंतर घरातील कपडे वाळत घालण्यासाठी नातसुन आकांक्षा गेल्या असतांना विजेच्या तारेला अचानक विजेचा प्रवाह उतरल्याने तिचा धक्का लागून आकांक्षाचा मृत्यू झाला अवघा दीड वर्षांपूर्वी आकांक्षा विवाह झाला होता.आकांक्षाच्या मृत्यूने अर्धावरच संसाराचा डाव मोडल्याने हळहळ तर विज कंपनीच्या गलथान कारभारामूळे निष्पाप नववाहितेचा मृत्यू झाल्याने संताप व्यक्त होत आहे.