बिजोरसे (दिनेश सोमवंशी) गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वातावरणातील बदलामुळे बागलाण तालुक्यातील अंबासन येथे अवकाळी पाऊस आणि त्याबरोबरच कडाक्याची थंडीमुळे अनेक मेंढ्याचा मृत्यू झाला आहे
एकांजी कोर, अरुण कोर असे मेंढपाळ शेतकऱ्यांचे नाव असून कालपासून सुरू असलेला पाऊस आणि त्याबरोबर कडाक्याची थंड हवेची लाट देखील सुरू असल्याने मेंढ्यांच्या मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
कोरोना नंतरच्या काळामध्ये अनेक घटनांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पुन्हा एकदा या मोठ्या संकटामुळे सर्वसामान्यांचे ही हाल सुरू आहेत.
काल रात्रभर झालेल्या पावसामुळे व कडाक्याच्या थंडीमुळे आमच्या 35 ते 40 मेंढ्या दगावल्या असून निसर्गाने आमचे उत्पन्नाचे साधन हिरावून घेतले आहे, इतर मेंढ्यांना आम्ही शेकोटी करून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यामुळे शासनाने या गोष्टीचे गंभीर दखल घेऊन आम्हास नुकसानभरपाई द्यावी - एकंजी कोर, शेतकरी - अंबासन