मालेगाव (जय योगेश पगारे) रसूलपुरा येथील घराच्या दरवाजाचे कूलूप बनावट चावीने उघडून घरात प्रवेश करून घरातील उघड्या लोखंडी कपाटाच्या लॉकरचे कूलूप तोडून त्यात ठेवलेले रोख रूपये व सोन्या चांदिचे दागीने असा एकूण 4,66,200 रू किं चा माल चोरट्यांनी लांबवला होता, या प्रकरणातील दोन युवकांना आज अटक करण्यात आली.
हमीदा शेख मुनीर (50) या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार- 21/12/2021 रोजी दुपारी १२ ते रात्री ८ दरम्यान बोहराबाग रसूलपूरा येथे फिर्यादीच्या घरात चोरी त्याचे जावई शेख शरिफ शेख गणी यानेच केल्याचा संशय असले बाबत दिलेल्या फिर्यादीवरून गून्हा दाखल करून तांत्रिक पद्धतीने तपास सुरू करून या गुन्ह्याची उकल करून या प्रकरणातील संशयित
१) शेख शरिफ शेख गणी (३२)रसुलपुरा,
२) शेख गुफरान शेख इस्लाम(३०) रा. निहाल नगर,
या दोघांना दि.२३ रोजी अटक करत किल्ला पोलिसांनी हा गुन्हा २४ तासांच्या आत उघडकीस आणला. त्यामूळे पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे, या कामगिरीसाठी किल्ला पोलिसांना अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी,उप विभागीय पोलीस अधिकारी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले व सदर कारवाई किल्ला पोलिस ठाण्याचे पी आय दिगंबर भदाणे , एपीआय जगदीश बोरसे, पो शि मनोज चव्हाण, पो शि निलेश निकाळे, पो ना सुनील भामरे यांच्या द्वारे करण्यात आली