📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवळा तालुक्यातील दहिवड येथे पुन्हा बिबट्याची दहशत; शेतकऱ्यावर हल्ला

 देवळा |ज्ञानेश्वर आढाव

दहिवड गावातील लवखाड मळा  येथे तीन बछडे असलेल्या बिबट मादीने धुमाकूळ घातला असून  शुक्रवारी (ता.24)  पहाटेच्या सुमारास विद्युत वितरण कंपनीने रात्रीच्या सुमारास विजपुरवठा सुरू केल्या कारणाने शेतकरी श्री बळीराम आनंदा देवरे यांचें नातू ऋषिकेश सुभाष बच्छाव सुनील सुभाष बच्छाव हे विद्युत पंप सुरू करण्यासाठी शेतात गेले असता त्यांना गुरगुरण्याचा आवाज आला सत्यता बॅटरी प्रकाश झोतात पडताळून पाहिली असता त्यांना तीन बछडे व एक बिबट मादी आढळून आली सदर वेळी सदर मादीने त्यांचावर झडप घातली असता त्यांनी आरडाओरड केली आजुबाजुला असलेले शेतकरी धाऊन आले त्यांनी त्यांचा बचाव केला, यााबाबत वनअधिकारी देवळा यांना संपर्क साधला आहे,  दुसऱ्या घटनेत सायंकाळी 6 वाजुन 30 मिनिटांनी दोन्ही भावातील एक भाऊ गुरांसाठी चारा कापत असतांनाच सदरील बिबट मादी त्याचे अंगावर धावून आली आजुबाजुला शेतकरी असल्याने त्याचा जीव वाचलेला आहे


बिबट्यांच्या मुक्त संचार आहे,  शेतकऱ्यांचे जीव धोक्यात आहे,  उद्या काहीही घडू शकते वन विभाग देवळा कार्यालयाने दखल घ्यावी

- संजय दहिवडकर
तालुकाध्यक्ष प्रहार शेतकरी संघटना देवळा

फाईल फोटो

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने