मालेगांव () २००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटातील खटल्यात आता नवा ट्विस्ट आला आहे. मालेगाव खटल्यातील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अर्थात एनआयएच्या विशेष न्यायालयात राज्यातील एटीएस विरोधात खळबळजनक असा दावा केला आहे. मालेगावच्या खटल्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित काही व्यक्तींना गोवण्यासाठी एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकाने दबाव टाकल्याचा आणि त्यासाठी छळवणूक केल्याचा गौप्यस्फोट या साक्षीदाराने केला आहे.
या दाव्याने आता मालेगाव खटल्यात एक नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. २००८ साली महाराष्ट्रातील मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएतर्फे केला जात आहे. या तपासात सध्या अनेक नवे गौप्यस्फोट होताना दिसत आहेत. अत्तापर्यंत या खटल्यातील तब्बल १३ साक्षीदारांनी आपल्या साक्षी फिरवल्या आहेत. या तपासात त्यांनी आधी नोंदवलेल्या साक्षीपासून त्यांनी फारकत घेतली आहे. आपण अशी साक्ष दिलीच नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.