📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

उडाणटप्पू युवकांच्या छेडछाडीला कंटाळून युवतीची आत्महत्या; मालेगावात खळबळ

मालेगांव(मनोहर शेवाळे) मालेगावातील जाफरनगर भागात राहणाऱ्या आशिया मोहंमद कासीम या २० वर्षीय तरुणीने गल्लीतील उड्डाणटप्पू युवकाच्या एकतर्फी प्रेम व छेडछाडिला कंटाळून आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. 

कारण गेल्या अनेक वर्षांपासून हा युवक या तरुणीस ब्लॅकमेल करून लग्न करण्यासाठी जबरदस्ती करीत होता. या मुलाच्या सोबत असलेल्या काही गुंडांनी मुलीच्या घरावर हल्लाही केल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे. पवारवाडी पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, नातेवाईकांच्या तक्रारी नंतर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 
शहरातील जाफर नगर भागात राहणाऱ्या आशिया आणि जाफरीन या दोन भगिनी स्वतः शिक्षित आणि समाजाच्या रूढी परंपरेव्यतिरिक्त राहणं पसंत करणाऱ्या मुली होत्या. 

शहरातील एका भागात त्यांचे ब्युटीपार्लर देखील आहे. त्यांच्या या फॅशनेबल राहणीमान आणि सुंदरतेवर गल्लीतील टवाळखोर मुलांची वक्रदृष्टी त्या बहिणींवर पडली आणि छेडछाड सुरू झाली. छेडछाडीची तक्रार पोलिसांना व गल्लीतील लोकांना करण्यात आली तुम्ही फॅशनेबल का राहता, असे करून गल्लीतील लोकांनी या मुलींना साथ दिली नाही. ते घर एकटं पडलं अन शेवटी कुणीच साथ देत नाही म्हणून आशियाने आपले प्राण संपवले. 

आशियाचा बळी टवाळखोर युवकांनी घेतला किंवा समाजातील धार्मिक पगड्याने याचा विचार करण्याची वेळ आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने