📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

प्रोफेसर डॉ. दिनेश देवरे यांची विक्रमी झेप; 360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वर कोरले नाव

नंदुरबार (दि. २ डिसेंबर ) : नंदुरबार येथील हिरिबेन गोविंददास श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रोफेसर डॉ. दिनेश बबन देवरे यांची 360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. प्रोफेसर डॉ. देवरे यांनी आतापर्यंत देशभरातून व राज्यातून 1850 हुन अधिक सन्मानपत्र, 125 राष्ट्रीय पुरस्कार, 25 हुन अधिक सुवर्णपदक मिळवत हा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. 

प्रोफेसर डॉ. देवरे यांनी कीटकशास्त्र यामध्ये डॉक्टरेट केली असून सध्या ते श्रॉफ महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. कोरोना काळात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे आतापर्यंत 11 रिसर्च पेपर आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांना जगभरातील अनेक नामांकीत महाविद्यालयाकडून देखील 'मानद डॉक्टरेट' देऊन गौरविण्यात आले आहे. 

360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस ही आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध विश्वविक्रम करणाऱ्या विक्रमांची नोंद घेणारी ऑर्गनायझेशन असून डॉ. देवरे यांच्या सार्थ निवडीबदल अनेक क्षेत्रातील मान्यवरांकडून व समाजमाध्यमातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने