मालेगाव | ज्ञानेश्वर आढाव
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वातावरणातील बदलामुळे तसेच संततधार पाऊस व थंड वाऱ्यामुळे थंडी वाढल्याने कसमादे पट्ट्यातील अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत, यातच आता सटाणा देवळा पाठोपाठ मालेगाव तालुक्यातही थंडी व पावसाने अनेक शेळ्या-मेंढ्यांचा बळी गेला आहे
मालेगाव तालुक्यातील हाताने येथील श्री बोरकर यांच्या सुमारे तीस मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, तसेच दहीदी येथे की दहा मेंढ्यांचा मृत्यू माहिती मिळत आहे
पंचनामा करून नुकसानग्रस्तांना योग्य भरपाई देण्याची मागणी यशवंत सेना तसेच मेंढपाळ कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे