📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तीन दिवसात फक्त तीनच उमेदवारी अर्ज दाखल; ते ही फक्त भारतीय जनता पक्षाचे..

 देवळा |  ज्ञानेश्वर आढाव
 देवळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी( दि ३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसा अखेर तीन उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सि एच देशमुख यांनी दिली . यात प्रभाग क्रमांक ४ मधून माजी सरपंच सुलभा जितेंद्र आहेर , प्रभाग क्रमांक ५ मधून माजी माजी सरपंच व गटनेते जितेंद्र रमण आहेर, प्रभाग क्रमांक १७ मधून प्रकाश तारू आहेर या उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवार दि ७ पर्यंत असून , उद्या शनिवारी व रविवारी सुट्टी असल्याने  उर्वरित पुढील दोन दिवसांत सोमवार ,मंगळवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इस्चुकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  देवळा शहरात राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, पुढील रणनीती ठरविण्यासाठी राजकीय पक्षाच्या गुप्त बैठका घेतल्या जात असून, भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे . खरे चित्र माघारी नंतर स्पष्ट होईल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने