मालेगाव (मनोहर शेवाळे ) आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून साेशल मीडियावर व्हायरल केल्याने नगरसेवक अयाज हलचल यांना पाेलिसांनी अटक केली आहे. त्रिपुरा येथे मुस्लिम नागरिकांवर अन्याय हाेत आहे. तेथे सुरू असलेले दंगे राेखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत हलचल यांनी इतर चौघांच्या मदतीने एक व्हिडिओ तयार केला हाेता. हा वादग्रस्त व्हिडिओ व्हाॅटस्अप ग्रुपवर प्रसारित करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार ८ नाेव्हेंबरला घडला हाेता. आझादनगर पोलिसांनी व्हिडिओच्या अनुषंगाने चौकशी करून शनिवारी दुपारी गुन्हा दाखल केला.
अटक केलेल्या 22 दंगलखोरांना 4 दिवसांची पोलिस कोठडी
मालेगाव येथील बंदला हिंसक वळण लागले होते त्यात दंगलखोरांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती, त्या अनुषंगाने पोलिसांनी 22 जनांना अटक केली असून त्यांना ४ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे .
मालेगावात शांतता; सोशल मिडीया, WhatsApp ग्रुपवर पोलिसांची करडी नजर
मालेगावात आता सर्व सुरळीत असून शांतता आहे, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसे सोशल मिडीया, WhatsApp ग्रुपवर कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह, वादग्रस्त मेसेज विडीयो अथवा तत्सम गोष्टी अफवा पसरवू नये असे आवाहन मालेगाव पोलिसांकडून करण्यात आले आहे.
तर Admin वरही गुन्हा दाखल होणार
WhatsApp ग्रुपवर कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह, वादग्रस्त मेसेज विडीयो ,अफवा पसरवू नये असे आवाहन मालेगाव पोलिसांकडून करण्यात आले आहे. जर कुणाला असे मेसेज आले तर ते तत्काळ डिलीट करावे व पाठविणाऱ्या व्यक्तीला समज द्यावी, जर एखाद्या ग्रुपवर अश्या गोष्टी आढळल्या तर admin ला ही दोषी ठरविण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले
Tags
MALEGAON