मालेगांव | जय योगेश पगारे
गेल्या दोन दिवसांपूर्वी वाढलेली थंडी अचानक कुठे गायब झाली? असा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल, नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मालेगावात कडाक्याची थंडी पडण्याचे अनुभव गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक मालेगावकराला येत आहेत.
परंतु राज्यातील हवामानात अचानक होणारे बदल यामागचे मुख्य कारण आहे
राज्यात पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस ! हवामान खात्याचा अंदाज
राज्यात पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे
तसेच 17 नोव्हेंबरच्या आसपास अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल - त्यामुळे राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस होईल -असे हवामान विभागाने सांगितले
16 ते 18 नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्हात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल
तसेच बीड नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना पुढील दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे - असे के एस होसाळीकर यांनी सांगितले
पुढचे 4-5 दिवस राज्यात वीजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता . येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा . तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3QwEY भेट द्या pic.twitter.com/yfxVnSWjbG
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) November 15, 2021
Tags
cold