📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव तालुक्‍यातील कुकाणे येथे सरपंच चषक या नावाने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न

सचिन पगार (मालेगाव लाईव्ह ब्युरो )  मालेगाव  तालुक्‍यातील कुकाणे येथे  सरपंच चषक या नावाने भव्य टेनिस बॉल  क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच चषक या नावाने स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यात  नाशिक जिल्ह्यातील विविध  60 संघांनी भाग घेतला होता. प्रथम बक्षिस सरपंच डॉ.प्रा.राजश्री अहिरे व डॉ.प्रा.कैलास अहिरे तसेच द्वितीय बक्षिस  सोसायटी चेअरमन श्री.गोविंद लोंढे व श्री. सुनील खैरनार  आणि तृतीय बक्षिस श्री.एकनाथ अहिरे  यांच्यातर्फे देण्यात आले 
ग्रामीण भागातील कुकाणे हे गाव  क्रिकेट व विविध स्पर्धेमुळे नावाजले गेले आहे. या सामन्यांसाठी शेकडो प्रेक्षकांनी हजेरी लावली. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न झाला.  प्रथम पारितोषिक कुकाणे न्यूयंगस्टार ' आणि द्वितीय पारितोषिक ' वीर एकलव्य कुकाणे ' या तसेच ' तृतीय पारितोषिक हे एस.एस.पी मालेगांव ' संघांना मिळाले.रोख स्वरूपात पारितोषिक आणि युगांतर प्रतिष्ठान, कुकाणे सन्मान चिन्ह देऊन व एल.आय.सी मालेगाव  यांच्या कडून मॅन ऑफ मॅच सिरीज देऊन गौरवण्यात आले. 'या स्पर्धेद्वारे सरपंच डॉ.प्रा.सौ.राजश्री अहिरे  यांनी या गावात अँब्युलन्स साठी या स्पर्धेचे आयोजन केले असल्याने सांगितले. खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला तसेच मैदानी खेळांनमुळे  आपले आरोग्य चांगले राहते.असे प्रतिपादन त्यांनी केले.तसेच सर्व विजयी संघाचे स्वागत केले.
या प्रसंगी डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे ,श्री.दीपक शेवाळे, बबलू खैरनार,धनराज अहिरे,केदा पगार, गणेश लहामगे, सतिष माळी,रामदास माळी आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने