📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

नगरसेविका आशा आहिरे व सामजिक कार्यकर्ते प्रकाश आहिरे यांच्या पुढाकाराने गाईचे प्राण वाचविण्यात यश

सोयगाव (जय योगेश पगारे) आज पहाटेच्या सुमारास सोयगाव येथील जुन्या ग्रामपंचायत परिसरात गाय एका निमुळत्या झाकण असलेल्या खड्ड्यात पडली असतांना परिसरातील नागरिकांनी  याबाबत नगरसेविका आशा अहिरे व प्रकाश अहिरे यांना कळविले, त्यानुसार हे दोघे त्वरित घटनास्थळी पोहचले व जेसीबी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने अथक प्रयत्नांनंतर गायीचा जीव वाचवण्यात त्यांना यश आले व  डॉक्टरांना बोलावून गायीचा इलाज करण्यात आला

यावेळी म.न.पा.चे मुकादम प्रकाश बच्छाव, परिसरातील पुंजाराम बच्छाव, अनिल बच्छाव, समाधान बच्छाव, आहिरे सर, पंकज बच्छाव, सागर बच्छाव व परिसरातील नागरिकांनी व तरुण मंडळीनी जीव वाचवण्यात मदत केली. 

गाईचा जीव वाचविल्याने  परिसरात याबाबत कौतुक होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने