मालेगाव (जय योगेश पगारे) काल सायंकाळी वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या कॉलेज स्टॉप भागात दुचाकी व ॲपेरिक्षाचा अपघात होऊन सोयगाव भागातील पार्श्वनाथ नगर येथील दोन महाविद्यालयीन युवतीं पैकी एकीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. देवयानी नंदलाल सुर्यवंशी (१७) ही जागीच मरण पावली असूनअसून, अपूर्वा सुधीर शेवाळे (१८) ही गंभीर जखमी झाली आहे.
या दोघी कॅम्प भागातून कॉलेज स्टॉपकडे स्कुटीने (एम एच ४१ जे ८२७३) जात असताना ओव्हरटेकच्या नादात ॲपे रिक्षाला (एम एच ४१ एटी ०६९१) ला धडकल्या. यात सुर्यवंशी हिच्या डोक्याला गंभीर इजा झाली ती जागीच गतप्राण झाली तर सहप्रवासी शेवाळे ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
वृत्तवेध च्या कसमादे अपडेट, मालेगाव लाईव्ह ने कॉलेज स्टॉप वरील वर्दळीचा विषय नेहमीच चव्हाट्यावर आणला होता, परंतु प्रशासकीय उदासीनता व नियोजनाअभावी सदर चौकात नेहमीच वर्दळ असते याशिवाय रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे सदर भागात छोटे-मोठे अपघात रोज घडत असतात त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीकडे गंभीर लक्ष देऊन सदर भागात योग्य ती व्यवस्था करावी.