📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

नाशिक हादरले ! नाशिकमध्ये भाजप नेत्याची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या; भाजप कार्यकर्ते आक्रमक, सातपूर पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या.

नाशिक: खूनाच्या घटनेमुळे नाशिक शहर  हादरले आहे. नाशिकमध्ये भाजप नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पाच दिवसांतील ही खूनाची तिसरी घटना आहे. नाशिकमध्ये सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर भाजप आक्रमक झाले आहे. भाजप कार्यकर्त्यांनी नाशिकच्या सातपूर पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल इघे यांना शुक्रवारी सकाळी फोन करुन घराबाहेर बोलवण्यात आले. त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अमोल इघे यांचा जागीच मृत्यू झाला. अमोल इघे यांची हत्या राजकीय पूर्व वैमनस्यातून झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सातपूरा पोलिसांनी या घटने प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. दिवसाढवळ्या भाजप नेत्याच्या हत्येमुळे नाशिक शहर हादरले आहे. 

अमोल इघे यांच्या हत्येनंतर नाशिकमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी सातपूरा पोलिस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. आरोपीला तात्काळ अटक करुन त्याच्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. याआधी देखील नाशिकमध्ये हत्येच्या घटना घडल्या आहेत. नाशिकमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. पाच दिवसातील हत्येची ही तिसरी घटना आहे. याआधी म्हसरुळमध्ये सराईत गुन्हेगारीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तर दोन दिवसांपूर्वी पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भाजी विक्रेत्याची हत्या करण्यात आली होती.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने