प्रशांत गिरासे | नाशिक ब्युरो
🛑 काळजाला हात घालणारी दुर्दैवी घटना
🛑 माय-लेकीनं संपवलं आपलं आयुष्य
🛑 घरातील कर्त्या पुरुषाचा,5 महिन्यांपूर्वी झाला होता कोरोनामुळं मृत्यु
🛑तेव्हापासूनच प्रचंड निराशा आणी अडचणींचा सामना करीत होत्या माय-लेकी
🛑 मनाला चटका लावून जाणारी सुसाईड नोट लिहून आत्महत्या
नाशिक( ता. 2 ) विनय नगर येथे ही काळजाला चटका लावून जाणारी दुर्दैवी घटना घडली आहे, महिलेच्या पतीचे काही महिन्यांपूर्वी कोरोनामुळे दुर्दैवी निधन झाले होते, तेव्हापासून दोन्ही मायलेकी प्रचंड तणावाखाली जगत होत्या, एकीकडे पती विरह दुसरीकडे मुलगी रोज आपल्याला तिच्या वडिलांबद्दल विचारते यामुळे काय उत्तर द्यावे ते हेच दुर्दैवी महिलेला कळत नव्हते त्यामुळे टोकाचे पाऊल उचलत दोघा मायलेकींनी राहत्या घरात सुसाईड नोट लिहून गळफास घेत आत्महत्या केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की नाशकातल्या विनय नगर भागातील सुख सागर कॉम्प्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहणारे प्रवीण तेजाळे यांचे पाच महिन्यांपूर्वी कोरोनामूळे निधन झाले होते, तेव्हापासून मुलगी अनया (७) सतत आईला वडील कधी येतील असे विचारत होते, त्यावर आई सुजाता प्रवीण तेजाळे (३६) तुझे बाबा 'स्टार' झाले असे सांगत होती, परंतु अनया पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारत होती, त्यामुळे सुजाता निरुत्तर होत होत्या,
जन्म आणि मृत्यू बाबत कुठलाही लवलेश नसलेली निरागस अनया पुन्हा - पुन्हा आईला आपल्या वडिलांबद्दल विचारत होती, आपण रोज देवाची पूजा करतो तरीही पप्पा परत येणार नाही का? असे अनया आईला नेहमी विचारत असे,
मुलीचा व भविष्याचा विचार करून सुजाता आणखीच जास्त चिंतेत राहत होत्या याशिवाय अनया व सुजाता दोन्ही एकट्या राहत असल्याने अनया सुजाताला नेहमी एकांतात प्रश्न विचारत होती, त्यामुळे अत्यंत हताश व भावनिक झालेल्या सुजाताला काय करावे हे सूचेना, उद्या माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर माझ्या मुलीचे काय होईल, पैसाच सर्व काही नाही, तसेच माणसे कितीही चांगले असले तरी आयुष्यभर कोणी कोणाला साथ देत नाही, माझ्या गैरहजेरीत माझ्या मुलीचं काय होईल या चिंतेने नैराश्य आलेल्या सुजाताला सकाळी अनया अचानक झोपेतून उठल्यावर म्हणाली की
मम्मा पप्पा नाही तर तू ही सॅड, आणि मी पण सॅड
त्यावर सुजाता तिला म्हणाल्या मग आता मी काय करू? यावर अनया म्हणाली की
आपणही स्टार बनुन पप्पाजवळ जाऊ..
लेकीच्या या बोलण्यावर सुजाता यांनी विचार करून शेवटी सुसाईड नोट लिहून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला व जगाने काहीही म्हटले तरी मी माझ्या मुलीचा व तिच्या भविष्याचा विचार करून हा कठोर निर्णय घेत आहे, मी वैरीण नाही मी आई आहे आणि मी तिला ज्याप्रमाणे जन्म दिला आहे तसाच तिच्या आयुष्याचा विचार करूनच असा निर्णय घेत आहे अशी सुसाईड नोट लिहून अखेर आपल्या अल्पवयीन मुलीसह मातेनं राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं...