📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगावचे रोहन कुवर एमपीएससी परीक्षेत मागास प्रवर्गातून राज्यात प्रथम....

मनोहर शेवाळे | मालेगाव
राज्य लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राज्यात 13 ते 15 जुलै,2019 या कालावधीत घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा २०१९ या परीक्षेचा निकाल  आज जाहीर करण्यात आला आहे. यात मागास प्रवर्गातून मालेगावचे रोहन कुवर,  सर्वसाधारण वर्गवारीमधून प्रसाद चौगुले आणि महिला वर्गवारीतून मानसी पाटील  राज्यात प्रथम आल्या आहेत.
परीक्षेच्या एकूण ४२० पदांचा सुधारित अंतिम निकाल लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्रांवरुन तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून हा निकाल जाहीर करण्यात आला असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. सोबत उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाने निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली.

या निकालानंतर अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईल मध्ये पाठविल्याच्या तारखेपासून 10 दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करता येणार आहे. आयोगाकडून हा निकाल जाहीर करताना भरतीप्रक्रिया राबविण्यासंदर्भात शासनाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचनानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता आरक्षीत असलेली पदे अराखीव (खुल्या) पदांमध्ये रुपांतरीत करण्यात आली आहेत. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या तसेच दीव्यांग आणि अनाथ आदी आरक्षणासाठी असलेल्या न्यायालयाच्या, प्राधिकरणाच्या विविध निर्णयांचा अवलंब करण्यात आला असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने