📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

नराधम पतीने केला पत्नीचा खून; दिवस भर सोबत फिरले, रात्री एकत्र जेवण केले पुढचे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल

नाशिक | प्रशांत गिरासे

बिटको चौकात असलेल्या पवन हॉटेल मध्ये पतीने केला पत्नीचा खून.... नाशिकरोड येथील पवन हॉटेलच्या रूम नंबर 110 मध्ये रात्री 9.30 च्या सुमारास खुनाची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पोपट वीर रा. कोपरगाव ह्याचे ज्योती हिच्या सोबत दुसरे लग्न झालेले होते. पहिली पत्नी पासून पोपट वीर यास तीन अपत्य असून तिघांचे लग्न झालेले आहे. ज्योती हिला 14 आणि 12 वर्षाची मुलगी आणि 9 वर्षाचा मुलगा आहे. गेल्या चार महिन्यांपासून ज्योती आपल्या माहेरी गुलमोहर कॉलनी येथे राहत होती. आज सकाळी पोपट हा सकाळी कोपरगाव येथून शालिमार येथे आला आणि ज्योती आणि मुलांना बोलवून घेतले. सर्व जण शहरात फिरले जेवण केले, फिरले, खारिदी केली आणि सायंकाळी हॉटेल मध्ये आले.
 
तिथे पोपट ने दोन रूम बुक केले. एका मध्ये दोन्ही पोर झोपले दुसऱ्या मध्ये नवरा बायको. रात्री 9.30 च्या सुमारास दोघांमध्ये काही झाले आणि पोपट याने पत्नी ज्योती हीचा ओढणीने गळा आवळून खून केला. नाशिकरोड पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. पत्नीचा खून केल्यानंतर हाॅटेल मधून बाहेर पडणाऱ्या पतीला नाशिकरोड पोलिसांनी बिटको पाॅईंट परिसरातून ताब्यात घेतले आहे. रुममध्येच पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर पती पोपट बाहेर पडत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयिताला लगेचच ताब्यात घेतलं.
 
नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक गणेश न्याहळे, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केल्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने