मालेगाव : येथील प्रभागात चार वर्षांपासून एलईडी दिव्यांची प्रतीक्षा होती. नगरसेविका आशा आहिरे यांनी महासभेत एलईडी दिव्यांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केल्याने त्याची दखल घेत मनपा प्रशासनाने तत्काळ एलइडी दिवे उपलब्ध करून दिले आहेत. प्रभागातील अनेक भागात दोन ते तीन वर्षांपासून पोल उभे करण्यात आले होते मात्र पथदीप नसल्यामुळे नागरिकानीं नाराजी व्यक्त केली. मात्र नगरसेविका आहिरे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने गेल्या चार वर्ष्यापासून एलईडी दिव्यंच्या प्रतीक्षेनंतर पथदीप बसविण्यास सुरुवात केली आहे. नगरसेविका आहिरे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
पथदीप मिळाले नाहीत तर आपण आंदोलन करू, असा इशारा देखील सत्ताधारी गटाच्या नगरसेवक आशा आहिरे यांनी दिला. यावर विद्युत अधीक्षक अभिजित पवार यांनी मूळ ठेकेदार पुरवठा करत नसल्याने कायदेशीर व तांत्रिक अडचण स्पष्ट केली. एलईडी दिवे पुरवठ्यास स्थानिक ठेकेदार नियुक्त करून पथदिवे उपलब्ध करून प्रभागातील अनेक भागांमध्ये पथदीप लावण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे शिपाई कॉलोनी येथील रेखाबाई आहिरे, अरुणा पाटील, लता पगारे, माई पाटील,शत्रूघन चंदन, आनंद निकम आदी नागरिकांनी समाधान व्यक्त केले,.
प्रतिक्रिया : कृष्णांजली नगर, शिपाई कॉलनीत मोकळ्या जागेत गेल्या दोन वर्ष पथदीप नव्हते मात्र नगरसेवक आशाताई आहिरे यांनी पाठपुरावा करून पथदीप उपलब्ध करून दिले आहेत.
श्री. काळुंखे, नागरिक
