📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवळा तालुक्यात तीन दिवस लसीकरण मोहीम बंद.

राकेश आहेर | चांदवड देवळा

     कोरोना सुरू झाल्यापासून आरोग्य विभागाच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णांना अविरत सेवा दिली. तसेच लसिकरणाचेही कार्य प्रभावीपणे राबवत आहेत. पण आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांनकडून योग्य वागणूक मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे.

  सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत पास्ते या गावांमध्ये लसीकरण सत्र सुरू असताना गावातील काही नागरिकांनी लसीकरण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दि .१७ रोजी दुपारी घडली होती या प्रकारामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात असून, याचे तीव्र पडसाद देवळा तालुक्यात देखील उमटले ( दि.१८ ) पासून तीन दिवस लसीकरण सत्र बंद करण्याचा निर्णय सर्व संवर्ग जिल्हा परीषद कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाने घेतला आहे. तसेच यापुढील जिल्ह्यातील सर्वच लसिकरण केंद्रावर पोलीस बंदोबस्त मिळत नाही तोपर्यंत लसिकरण मोहीम थांबविण्यात येणार असल्याचा सर्व आरोग्य कर्मचारी संघटनांनी निर्णय घेतला आहे.


लस ही प्रत्येकालाच मिळणार असून लसिकरण केंद्रावर गर्दी न करता लस घ्यावी, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे. ग्रामपंचायत तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी लसिकरणासाठी पुढाकार घ्यावा.

     - डॉ. स्वाती मोरे 

वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मेशी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने