📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मुंबईत बिकेसी येथील निर्माणाधीन उड्डाणपुलाचा भाग कोसळला, 13 कामगार जखमी


मुंबई  (जय योगेश पगारे ) मुंबईच्या बीकेसी परिसरात शुक्रवारी पहाटे उड्डाणपूल कोसळल्याची दुर्घटना घडली. हा पूल निर्माणाधीन होता.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बीकेसी मेन रोड आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड यांना जोडणारा उड्डाणपूल निर्माणाधीन आहे. काम सुरु असताना हा उड्डाणपूल पहाटेच्या वेळी अचानक कोसळला. आतापर्यंत मिळालेली  माहिती अशी की, ही दुर्घटना घडली तेव्हा पूलावर 20 ते 25 कामगार काम करत होते. दरम्यान, पूलाचा एक गर्डर निखळायला सुरुवात झाली. काहीतरी गडबड आहे हे ध्यानात येताच मजूरही सतर्क झाले. दरम्यान, गर्डर निखळून खालीच पडला. त्यानंतर मजुरांनी तेथून पळ काढला. मात्र, ज्यांना पळता आले नाही ते मजूर पूलासोबतच खाली कोसळले. ते बाजूच्या नाल्यात कोसळले. त्यामुळे ते जखमी झाले

दरम्यान, या दुर्घटनेत जखमी झालेल्या मजूरांची दुखापत किती आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. पूल कोसळल्यावर आजूबाजूला मातिचा ढिगारा पसरला आहे. या ढिगाऱ्याखाली कोणी अडकल्याची अद्याप तरी माहिती नाही. उड्डाणपूल नेमका का कोसळला याबाबत मात्र अद्याप माहिती समोर आली नाही.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने