📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

रणादेवपाडे येथे हिंस्त्र श्वापदांचा धुमाकूळ, मुक्त संचार करीत अनेक जनावरे फस्त

देवळा: (ज्ञानेश्वर आढाव)

          देवळा तालुक्यातील रणादेवपाडे येथे बऱ्याच दिवसांपासून हिंस्त्र जंगली श्वापदांचा मुक्त वावर आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, यातच आज मध्यरात्री रणादेवपाडे येथील शेतकरी जिभाऊ मोतीराम सावंत यांच्या शेतात बिबट्या सदृश हिंस्त्र श्वापदाने पाळीव प्राण्यांवर हल्ला केला, यात एका गाईचा मुत्यू झाला या आधीही अशीच घटना येथे घडली होती, तेव्हा ही हिंस्त्र श्वापदाने पाळीव प्राण्यांची शिकार केली होती.


          त्यावेळी वन विभागाने पंचनामा करून , शेतकऱ्याला नुकसान भरपाईचे आश्वासन दिले होते, परंतू अद्याप पावेतो शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली नाही, त्यातच आज आणखी दुर्दैवी  घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, याशिवाय  शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 याशिवाय परिसरातील अनेक भटकी कुत्री बर्‍याच दिवसांपासून  गायब आहेत, त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची दाट शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे, या आधीही या परिसरात बिबट्याचे दर्शन अनेकांना झालेले आहे 

       यावेळी शेतकऱ्यांनी वन विभागानकडे नुकसान भरपाई लवकर मिळावी अशी मागणी केली व या हिंस्त्र श्वापदाला  पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने