📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

आर बी एच कन्या विद्यालयातील विद्यार्थिनीचे NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश

मालेगाव (किरण बागुल)आर बी एच कन्या विद्यालयातील इयत्ता 8 वी च्या एकूण 11 विद्यार्थिनींनी आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत प्रविष्ट झाल्या होत्या. ही परीक्षा सरकार खास गरीब आणि हुशार विद्यार्थीनींची शिक्षणात आर्थिक मदत करण्यासाठी राज्यभरात घेत असते. अश्या परीक्षेत विद्यालायतील दोन विद्यार्थिनी कु मोक्षदा दिपक सूर्यवंशी व कु सुदिक्षा दिपक निरभवणे यांनी उल्लेखनीय यश प्राप्त करून शिष्यवृत्तीस पात्र झाल्या. या विद्यार्थिनींना मार्गदर्शन श्री किरण बागूल यांनी केले.
   विद्यार्थिनींच्या या यशात संस्थेचे जनरल सेक्रेटरीं मा समाजश्री डॉ प्रशांतदादा हिरे, संस्थेचे समन्वय मा डॉ अपूर्वभाऊ हिरे, युवा नेते मा डॉ अद्वय आबा हिरे, सांस्कृतिक प्रमुख मा श्रीम संपदादीदी हिरे, संस्थेचे उपाध्यक्ष मा श्री अण्णासाहेब देवरे, विद्यालयातीच्या प्राचार्या सौ पाटील प्रमिला, उपप्राचार्या सौ सुचारिता ठाकरे व सौ साळुंके आर जे, पर्येंवेक्षिका सौ शेवाळे पी एस व सौ ठाकरे एल जे आणि सर्व शिक्षक बंधुभगिनी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने