📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना जामीन मंजूर

नाशिक (दुर्वेश पवार) जि.प. च्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर यांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. २५ हजार रूपयांचा बॉण्ड व दर सोमवारी नाशिकच्या एसीबी कार्यालयात हजेरी लावण्याच्या अटीशर्थीवर हा जामीन मंजूर करण्यात आला.  आठ लाख रूपयांची लाच स्विकारल्या प्रकरणात शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर यांना ठाणे एसीबी पथकाने बेड्या ठोकल्या होत्या. सलग चार दिवसांच्या पोलीस कोठडी नंतर गेल्या मंगळवारी त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे त्यांचा मुक्काम सेंट्रल जेलमध्ये होता. सोमवारी झालेल्या सुनावणीत मात्र त्यांना जामीन मंजूर झाला आहे.


जिह्यातील एका शिक्षण संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमीत वेतन सुरू करण्याच्या मोबदल्यात आठ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाच स्वीकारताना रंगेहाथ त्यांना अटक करण्यात आली होती

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने