📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

वाखारी येथील शेतकऱ्याचा विषारी सापाच्या चाव्याने मृत्यू

देवळा तालुक्यातील वाखारीचे  प्रगतीशील शेतकरी संतोष तुळशीराम भदाणे ( ६५ ) यांचा बुधवार रोजी विषारी सापाच्या चाव्याने मृत्यू झाला, या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे 

भदाणे हे काल सकाळी आपल्या गुरांसाठी शेतात भुईमुगाचा पाला आणण्यासाठी गेले असता त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटाला विषारी सर्पाने दंश केला.  त्यांना तातडीने उपचारासाठी देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करत उपचार केले परंतु शरीरात विष मोठ्या प्रमाणात पसरल्याने त्यांची तब्बेत चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले परंतु दुर्दैवाने तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन करून सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला होता थोड्याच काळाच्या अंतरात  पती पत्नी दोघांचाही मृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

दरम्यान शेतात जाताना शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेतल्यास मृत्यू टाळता येऊ शकतो, पुढील व्हिडीओ मध्ये बघा विषारी सापाचा दंश झाल्यास काय उपाययोजना केल्यास मृत्यू टाळता येऊ शकतो 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने