हवामान खात्याच्या कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद, नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, जालना, बुलडाणा, वाशीम, चंद्रपूर, आणि वर्धा या चौदा जिल्ह्यांना येल्लो अलर्ट आणि यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, पालघरमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
राज्यात अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. अनेक भागात पुर आल्याने जीवीतहानी आणि वित्तहानी होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद, नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, जालना, बुलडाणा, वाशीम, चंद्रपूर, आणि वर्धा या चौदा जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.