📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षकपदी डॉ. बी. जी. शेखर

डॉ . प्रतापराव दिघावकर हे प्रदीर्घ पोलीस सेवेतून या पदावरून निवृत्त झाले तेव्हापासून नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षकपद  मागील चार महिन्यांपासून रिक्त होते. यांनतर पोलीस अकादमीच्या संचालक अश्वती दोरजे यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता.
 काल गृह खात्याकडून काढण्यात आलेल्या बदली, पदस्थापना आदेशानुसार नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी मुंबई गुन्हे शाखेचे अपर आयुक्त बी. जी शेखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालक अश्वती दोरजे यांचीही नागपूर शहर पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, दोरजे यांच्या पदावर प्रतिक्षाधीन पोलीस अधिकारी राजेशकुमार मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने