मालेगाव (मनोहर शेवाळे) उप भूमि अभिलेख कार्यालय सटाणा येथील मुख्यालय सहाय्यकास दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले व अटक करण्यात आली आहे,
सुनील रामचंद्र मोरे, वय - 45 , असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे तो , उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय -सटाणा , ता-बागलाण, जि. नाशिक वर्ग-3 येथे मुख्यालय सहाय्यक म्हणून कार्यरत होता सटाणा येथील तक्रारदार यांचे शेत जमिनीची मोजणी करण्याच्या कामात चलन देवुन चलनाची माहिती ऑनलाईन भरून लवकरात लवकर नोटिसा देवुन त्यास मदत करण्यासाठी यातील आरोपीने तक्रारदार यांचेकडे दि.२९/०६/२०२१ रोजी रुपये २०००/- लाचेची मागणी करुन ती लाचेची रक्कम दि. २९/०६/२०२१ रोजी उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय सटाणा येथे स्विकारली यावेळी तक्रारदाराने लाचलुचपत विभागात तक्रार केल्याने सापळा रचण्यात आला होता व यावेळी आरोपीने ला स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
यावेळी सापळा अधिकारी- पोलीस निरीक्षक उज्ज्वलकुमार व्ही पाटील ला.प्र.वि., सह सापळा अधिकारी - पोनि. साधना बेलगावकर , ला.प्र.वि नाशिक, सापळा पथक - पो ना. एकनाथ बाविस्कर, पो ना प्रकाश महाजन लाप्रवि नाशिक, सापळा यशस्वी करण्यासाठी ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उप अधीक्षक सतीश भामरे यांचे मार्गदर्शन लाभले
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक
@ टोल फ्रि क्रं. 1064