बँक किंवा इतर कोणत्याही प्रकारचा सायबर गुन्हा असल्यास आपण 155260 या हेल्पलाईन नंबर वर कॉल करू शकता , सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कामांच्या दिवशी ही सेवा उपलब्ध असेल
तसेच कॉल करून कोणत्याही घटनेची तक्रार नोंदविली जाऊ शकते - असे केंद्र सरकारने सांगितले
जाणून घ्या याविषयी सविस्तर
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार - या हेल्पलाईन आणि त्याच्या रिपोर्टिंग प्लॅटफॉर्ममध्ये - स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि कोटक महिंद्रा बँक या बँकांचा समावेश आहे
याव्यतिरिक्त पेटीएम, फोनपे, मोबीक्विक, फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सारख्या पेमेंट आणि वॉलेट प्लॅटफॉर्मचा सुद्धा समावेश आहे