📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

वीज पडल्याने तरुणी व अनेक जनावरे ठार, दोन जण वाहून गेले.

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात वीज कोसळल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला आहे समृद्धी विष्णू तरटे (18) असे मरण पावलेल्या तरुणीचे नाव आहे,  तसेच एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. वीज पडल्याने १० शेळ्या आणि दोन गायी दगावल्या आहेत. जखमी तरुणीला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे 
मयत : समृद्धी तरटे 
वीज पडल्याने मरण पावलेल्या १० शेळ्या

फुलंब्री तालुक्यातील विरगाव पुलावर पाणी आल्याने दोन मोटारसायकलस्वार पुलावरून वाहून गेले होते. पण त्यांना गावकऱ्यांनी वाचवले आहे.
गेल्या 2 दिवसांपासून मराठवाड्यात मोठा पाऊस झाला नसला तरी अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. दिवसभर ढगाळ वातावरण असते आणि सायंकाळी 4 वाजेनंतर थोड्या वेळासाठी का होईना चांगला पाऊस गेल्या 3 दिवसांपासून पडतोय. आजही ढगाळ वातावरण आहे सायंकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने