📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

शहर सौंदर्याच्या शिरपेचात एक सुवर्ण तुरा; मोसम पुलावर रणगाडा दाखल

मालेगाव (जय योगेश पगारे) मालेगाव च्या सौंदर्यात आणखी एक भर पडली आहे, एकेकाळच्या बकाल अवस्थेत झालेल्या शहरात हळूहळू सुधारणा होत चालली आहे, मोसम पुल चे रुपयडेही पालटत आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याच्या सभोवतालचा परिसर नूतनीकरण करून आणखीच आकर्षक दिसत आहे, याबरोबर शहर वाहतूक शाखेचे समोरील जागेमध्ये आता रणगाडा बसवण्यात आला आहे, बऱ्याच दिवसापासून हा रणगाडा ख्वाजा गरीब नवाज अग्निशमन केंद्र ठेवण्यात आलेला होता, कोरोना काळात आलेल्या अडचणी मुळे रणगाडा त्याच्या अपेक्षित जागी ठेवण्यास उशीर झाला असला तरी देर आये दुरुस्त आये असे म्हणत प्रत्येक मालेगावकरांचे उर अभिमानाने भरून आले आहे.


कधीकाळी जातीय दंगली, बॉम्ब स्फोटांमुळे शहराचे शांततेला गालबोट लागले होते परंतु हळू समाजातील सौहार्द वाढत चालले आहे आणि प्रत्येक जण शहराच्या विकासासाठी आपापल्या परीने मदत करीत आहे,
मालेगावातल्या बऱ्याच चौकांचे सुशोभीकरण झाले आहे, बंद पडलेली सिग्नल यंत्रणा पुन्हा नव्या रुपात मालेगावकर यांच्या सेवेत दाखल झाली आहे, मोठ्या शहराकडे असणाऱ्या बऱ्याच सुविधा मालेगाव शहरात दाखल झाले आहे कोरोनामुळे दोन वर्षे वाया गेली असतील तरीही एका नव्या उमेदीने मालेगाव एका सुंदर शहराच्या दिशेने आगेकूच करत राहील यात शंका नाही

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने