📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

"दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलीच नव्हतीं", भारतीय शास्त्रज्ञांच्या दाव्यानं खळबळ

नवी दिल्ली वृत्तसंस्थाः देशात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तीव्र लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. देशात सध्या पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ची कोव्हीशील्ड आणि गुजरात मधील भारत बायोटेक कंपनीची कोवॅक्सिन या दोन लसी प्रामुख्याने दिला जात आहेत. यापैकी कोहीशील्डचा पहिला डोस दिल्यानंतर सहा ते आठ आठवडयानंतरचे आंतर वाढवून 12 ते 16 आठवडे करण्यात आले. सरकारच्या या निर्णयावर देशातील अनेकांनी आक्षेप घेत टीका केली होती. देशात लसीचा तुटवडा असल्यामुळे दोन डोस मधील अंतर वाढवण्यात आल्याचा दावा अनेकांकडून करण्यात आला होता. मात्र शास्त्रज्ञांच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. मात्र आता लसीच्या दोन डोस मधील अंतर वाढवण्याची शिफारस आम्ही केलीच नव्हती असा धक्कादायक खुलासा तज्ञ गटातील तीन सदस्यांनी केला. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमोलॉजीचे माजी संचालक एम डी गुप्ते यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की या शास्त्रज्ञांनी लसीचे दोन मधील अंतर आठ ते बारा आठवड्यापर्यंत वाढवण्यासाठी सहमती दर्शविण्यात आली होती पण डोस मधले अंतर 12 ते 16 आठवड्यापर्यंत वाढवण्याची शिफारस आम्ही केलीच नव्हती कारण बारा आठवड्यानंतर लस घेतलेल्या नागरिकांमध्ये काही संभाव्य परिणाम होऊ शकतो याचा डेटा NTAGI कडून आला नाही असे त्यांनी म्हटलं आहे. याच संस्थेच्या दुसऱ्या एका सदस्याने देखील गुप्ते यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या लसी मधील अंतर वाढवण्याचा निर्णय यामागे काहीतरी काळंबेर असावा असा संशय आता व्यक्त केला जात आहे. पी. मुलीविल यांनीदेखील सरकारच्या संबंधित निर्णयावर आक्षेप घेतला. त्यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की लसींच्या दोन डोस मधील अंतर वाढविण्याबाबत संबंधित तज्ज्ञ गटाचा चर्चा झाली हे खर आहे पण दोन डोस मधील अंतर हे 12 ते 16 आठवडे करावा अशी शिफारस आम्ही केलीच नव्हती. त्यासाठी नेमके आकडेही सांगितले नव्हते असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने