मालेगाव (कसमादे मीडिया न्यूज नेटवर्क)
- स्टींग ऑपरेशन करून बदनामी करण्याची धमकी- पैसे न दिल्याने पोलिसात तक्रार- पोलिसांनी तपासणी केली असता गैरप्रकार आढळला नाही
मालेगाव शहरातील हॉटेल व्यावसायिकास बदनामीची धमकी देत दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या दोघा पत्रकारांविरोधात किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
फिर्यादी देवीदास डांगचे (रा. संगमेश्वर)यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे व संशयित मोरे व उदागे यांनी डांगचे यांना आपण रयत राज्य न्यूज चॅनलचे पत्रकार असल्याचे सांगितले, तुमच्या मल्हार रिसॉर्ट व ईशा लॉज येथे वेश्याव्यवसाय केला जातो व ही बदनामी टाळण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली, पैसे न दिल्यास पोलिसांना सांगून लॉजचे स्टिंग ऑपरेशन करण्याची धमकी दिली.
विशाल नागेश मोरे व सागर उदागे अशी या संशयित पत्रकारांची नावे असुन त्यांना कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी दिली,
पैसे न मिळाल्याने दोघा संशयितांनी पोलिसांना माहिती दिली त्या माहितीनुसार पोलिसांनी लॉजची तपासणी केली असता कुठलाही गैरप्रकार आढळून आला नाही.
त्यामुळे जनमानसात बदनामी केल्याचा आरोप करत डांगचे यांनी किल्ला पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे, या प्रकाराबाबत पोलिस उपनिरीक्षक ढाकणे तपास करत आहे.