मालेगाव (जय योगेश पगारे) कोरोना महामारीने अनेकांचे संसार उध्वस्त केले अनेकांचे नाहक बळी गेले, अशातच अनेक मुला-मुलींचे पालक आई किंवा वडील किंवा दोन्हीही कोरोनाचे बळी गेले, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचे मोठे प्रश्नचिन्ह सर्वांसमोर उपस्थित राहिले, अशातच आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो ही जाणीव माणुसकी असलेल्या भावनिक लोकांना झाली
धर्मात्मा शैक्षणिक संस्था दरेगाव संचलित स्व. व्ही. डी. खैरनार आर्ट्स-सायन्स-कॉमर्स जुनियर कॉलेज (चिखल ओहोळ) कडून परिसरातील कोरोनामुळे पालक गमावलेल्या अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येणार आहे, या प्रशंसनीय कार्याची सुरुवात संस्थेच्या संस्थापक व संचालक मंडळींनी केली आहे.
यावेळी माहिती देताना कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती एस. वाय. वाघ यांनी सांगितले की या कोरोनाच्या कठीण काळात सर्वसामान्यांची जगण्याची कसोटी लागली आहे, तर ज्या घरातल्या कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे अशा परिवाराचे हाल शब्दात वर्णन करता येत नाही, त्यातच ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील दोन्ही कोरोनाचे बळी ठरले अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे हाल डोळ्यासमोर येतात, संस्थेचे संस्थापक व संचालक मंडळ यांनी परिस्थितीचे भान ठेवून आपलेही समाजाप्रती काहीतरी देणे आहेच या निर्मळ हेतूने आई-वडील किंवा दोन्ही पालक गमावलेल्या अकरावी-बारावीच्या सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण व प्रवेश आपल्या संस्थेच्या कॉलेजात मोफत करणार असल्याचे जाहीर केले व त्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाची सर्वोतपरी मदत केली जाईल असे आश्वासन दिले,
पालक गमावल्यामुळे शिक्षणाची परवड होऊ नये, घरातील कर्त्या व्यक्तींचे निधन झाल्याने विद्यार्थ्यांवर परिवाराचा गाडा ओढण्याची जबाबदारी पडू शकते अशाही विद्यार्थ्यांना शक्यतो परी मदत करण्यात येईल, त्यांच्या जबाबदारी बरोबर त्यांचे शिक्षणही पूर्ण होईल याची काळजी घेतली जाईल समाजातील अन्य घटकांनी या कठीण प्रसंगी आपापल्या परीने होईल तेवढी मदत या कोरोना ग्रस्तांना करावी असे आवाहन यावेळी संचालक मंडळातर्फे प्राचार्या वाघ यांनी केले
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी व नातेवाईकांनी
7057700848, 7057241754 या नंबर वर संपर्क करावा,
आपल्या माहितीतील अशा विद्यार्थ्यांना संपर्क करण्याची मदत करून द्यावी अशी विनंती यावेळी संस्थेतर्फे करण्यात आली आली