📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

इन्स्टाग्राम वरील मैत्री पडली महागात; अत्याचार झाल्याने अल्पवयीन मुलगी गर्भवती

नाशिक : सुनील ठाकरे (वय २७ ) या युवकाला सातपूर पोलिसांनी अटक केली आहे, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री करून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संशयित सुनील ठाकरेने इंस्टाग्रामद्वारे पीडित अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.  तरुणाने मुलीशी संवाद आणि संबंध वाढविले. संशयित प्रियकराच्या भेटीसाठी ती त्याच्या घरी गेली असता अल्पवयीन मुलीवर त्या तरुणाने अत्याचार केले. ही मुलगी गर्भवती झाल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. नंतर पीडित मुलीने सातपूर पोलीस ठाणे गाठत झालेला सर्वप्रकार पोलिसांना सांगितला. प्रेमाचा बनाव करत पीडितेला जाळ्यात ओढल्याचा आरोप पिडीतेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पीडितेच्या नातेवाईकांनी ठाकरे विरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्याच्या विरुद्ध भा.दं.वि कलम 376 व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार (पोस्को) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पीडित अल्पवयीन मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील करीत आहेत.

सध्या लॉक डाऊन व ऑनलाईन शिक्षणाच्या नावाने सर्वच विद्यार्थ्यांच्या हातात स्मार्टफोन आला आहे, बरेच विद्यार्थी अभ्यासाच्या नावाने दिवस दिवस भर ऑनलाईन गेम, सोशल मिडीयाच्या नादात वाया चालले आहेत , पालकांचे सुद्धा मुलामुलीवरील लक्ष कमी होताना दिसत आहे त्यामुळे सर्रास असे प्रकार घडताना दिसत आहेत. 





साभार: भ्रमर 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने