नाशिक : दिनांक 28 जून 2021 (मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा)
समाज कल्याण विभागांतर्गत पिंपळगाव बसवंत येथे अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची इयत्ता 6 वी ते 10 वी पर्यंतची शासकीय निवासी शाळा कार्यरत आहे. या शासकीय निवासी शाळेत मोफत प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमुद केल्यानुसार, 2021-2022 या शैक्षणिक वर्षाकरीता इयत्ता 6 वी साठी एकूण 40 जागेसाठी तर इयत्ता सातवी, आठवी, नववी, आणि दहावीच्या रिक्त असणाऱ्या जागांकरीता अनुसूचित जाती 80 टक्के, अनुसूचित जमाती 10 टक्के, विमुक्त जाती भटक्या जमाती 05 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 02 टक्के, तर दिव्यांग प्रवर्गासाठी 30 टक्के यानूसार आरक्षण असणार आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी ऑनलाईन अर्ज भरून प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्र
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी शाळेचा दाखला, जातीचा दाखला, मागील इयत्ता प्रगती पत्रक, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट फोटो, संचयी नोंद पत्रक (6 वी ते 8 साठी), आधर कार्ड, स्वास्थ प्रमाण पत्र इत्यादी कागदपत्रे सादर करावयाची आहेत. तसेच प्रवेशासंबंधित अधिक माहिती जाणून घेण्याकरीता मुख्याध्यापक आर. एन. वरकड 9028526925, शिक्षक एस. वाय. विसे 7709798572, एम. के. केदारे 8888583500 या क्रमांकांवर संपर्क साधावा अशी माहिती सहाय्यक आयुक्त श्री. वसावे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.