सोयगाव (दीपक पाटील ) पत्ता विचारण्याचे बहाण्याने पल्सर या दुचाकी वाहना वरून आलेल्या दोन भामट्यानी १५,००० रुपये किमतीची सोन्याची चैन गळ्यातून हिसकावून घेतली
याबाबत सविस्तर वृत्त असे की सोयगाव येथील श्रीकृष्ण कॉलनी मध्ये दोन अज्ञात भामटे पल्सर मोटारसायकलस्वार हे समोरुन येऊन मधुकर लक्ष्मण सरोदे रा. हनुमानवाडी श्रीकृष्ण कॉलणी सोयगाव यांच्या गळ्यातील १५०००/- रुपये किंमतीची दीड तोळे वजनाची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून पळून गेले याबाबत कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत