📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

आधी लसीकरण, मगच शाळा- डॉ. रणदीप गुलेरिया

       देशातचं नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. आता देशात तिसरी लाट येणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाचा फटका लहान मुलांना बसयला नको म्हणून 2020 पासून शाळा बंद आहेत. 
       मुलांना शाळा सुरू करून पुन्हा बाहेरचे जग खुले करायचे असतील तर मुलांना लस देणे हाच एक पर्याय आहे, असे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.
      गुलेरिया पुढे म्हणाले, 2 ते 18 वयोगटातील मुलांवर सप्टेंबरमध्ये कोव्हॅक्सिन लसीचे जे प्रयोग करण्यात आले, त्याचे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांचे निष्कर्ष हाती येतील. औषध नियंत्रकांनी  मंजुरी दिल्यानंतर मुलांना लस उपलब्ध होईल.
      मुलांसाठी फायझर आणि झायडस लसींचे पर्याय असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. शाळा सुरू करण्याआधी मुलांना लसीकरण बंधनकारक आहे असं देखील सांगण्यात येत आहे. 

🔴12 ते 18 वयोगटातील मुलांची संख्या 13 ते 14 कोटी आहे. त्यामुळे २५ ते २६ कोटी लसमात्रा लागतील.  

🔴कोव्हॅक्सिन आणि झायडस कॅडिलाच्या लसीच्या चाचण्याही मुलांवर चालू आहेत. 

झायडसला परवानगी मिळाल्यानंतर मुलांना ती लस देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. असं स्पष्टीकरण नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिलं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने