प्रतिनिधि :- दिनेश पगारे (दि.26 जून 2021)
कुकाणे गावात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त गावाच्या सरपंच डॉ. सौ. राजश्री अहिरे यांनी एक अनोखा उपक्रम राबविला. गावातील विधवा स्त्रियांकडून ग्रामपंचायत परीसरात वटवृक्ष रोपे लावून त्यांच्या हस्ते त्या वटवृक्षाची पूजा करुन घेत पारंपारीक विचारधारणेला छेद दिला , या उपक्रमाचा मुख्य उद्दिष्ट असा की प्रत्येक विधवा स्त्रीने एक वटवृक्ष लावावा त्याची दरवर्षी पूजा करावी जेणेकरून वृक्ष संवर्धन होईल व अंधश्रद्धा निर्मूलन होऊन समाज प्रबोधन होईल अशी माहिती सरपंच सौ.डॉ. राजश्री आहिरे यांनी दिली.यावेळी उपसरपंच सौ.रखमाबाई खैरनार , शरयु रौंदळ,कल्पना लोंढे, रत्ना जगताप, आदिसह महिला उपस्थित होत्या.
