मालेगाव (मनोहर शेवाळे: कसमादे मीडिया न्यूज नेटवर्क) राज्यातील लॉक डाऊन चे निर्बंध शिथील झाल्यानंतर पुन्हा सर्वत्र गर्दी होताना दिसत आहे ठिकाणी नागरिकांची झुंबड उडत असते, मागच्या वेळी प्रमाणेच कोरोना संपला अशा अविर्भावात नागरिक वावर करीत आहे, संभाव्य तिसरी लाट व डेल्टा प्लस या कोरोनाव्हायरस च्या नव्या म्युटेशन मुळे धोका वाढण्याची चिन्हे दिसत आहे,
या पार्श्वभूमीवर शासनाने पूर्वी लागू केल्याप्रमाणे पाच टप्प्यांत निर्बंधांचे विभागणी केली होती परंतु आता सर्वच जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या खाली नसणार आहे, त्यामुळे तिसऱ्या टप्प्यापर्यंत लागू असलेले सर्वच निर्बंध सर्व जिल्ह्यांना लागू होणार आहे त्यानुसार नाशिक जिल्ह्यात सोमवारपासून सर्व मॉल्स पुढील सूचनेपर्यंत बंद राहणार आहे.
याशिवाय विकेंड लॉक डाऊन मध्ये लग्नासाठी दिलेली सवलत चार जुलैनंतर नसणार आहे चार जुलै पासून केवळ सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत लग्नसमारंभासाठी सवलत दिलेली आहे असे आदेश आज जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत.