📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सरकारनं जारी केले नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल, आता सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वरच!


मालेगाव  (मनोहर शेवाळे - कसमादे मीडिया )  गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे करोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. त्यापाठपाठ करोनाच्या Delta Plus Variant मुळे देखील राज्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये रुग्णांमध्ये डेल्टा प्लस करोना विषाणू आढळून आल्यामुळे आणि त्याची संख्या हळूहळू वाढू लागल्यामुळे काही प्रमाणात पुन्हा निर्बंध घातले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल जाहीर केले आहेत. यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारने ५ टप्प्यांनुसार राज्यातील जिल्ह्यांची विभागणी केली होती. मात्र, आता तिसऱ्या टप्प्याच्या खाली कोणताही जिल्हा नसणार आहे

ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाने आज नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तथापि, आपल्या नाशिक जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये व सवलतींमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
-प्रशासन




साभार लोकसत्ता 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने