📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनच्या अध्यक्षपदी राजेंद्र दिघे यांची तर सचिवपदी सुमित बच्छाव यांची निवड.

प्रतिनिधि - दिनेश पगारे(दि.26 जुन 2021)
रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनच्या अध्यक्षपदी राजेंद्र दिघे यांची तर सचिवपदी सुमित बच्छाव यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी साडेसहाला अग्रसेन भवनात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सुप्रसिद्ध गझलकार प्रा. अनंत राऊत, माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, असिस्टंट गवर्नर दिलीप ठाकरे, अध्यक्ष राजेंद्र देवरे, सचिव केशव खैरनार उपस्थित राहणार आहेत. मावळते पदाधिकारी देवरे व खैरनार यांचेकडून दिघे व बच्छाव पदभार स्विकारतील. रोटरीच्या माध्यमातून सत्तर वर्षांच्या इतिहासात मालेगावात प्रथमच जिल्हा परिषदेचे शिक्षक प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून कार्यभार पाहणार आहेत. शिक्षण, आरोग्य व शेती या विषयावर वर्षभरात विविध प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने