मुंगसे (किशोर पाटील) मुंगसे गावातील शेतात राहणाऱ्या सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे,
अंगणात खेळत असताना विषारी सापाने चावा घेतलेल्या किशोर योगेश सोनवणे (11) या मुलाचा मृत्यू झाला आहे,
सर्पदंश झाल्यावर त्याला अत्यवस्थ अवस्थेत मालेगावी आणण्यात आले, परंतु उशीर झाल्यामुळे विष संपूर्ण शरीरात पसरले त्यामुळे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
कालच मालेगाव लाईव्ह ने सापांबद्दल जनजागृती करण्यासाठी माहिती दिली होती, सर्व वाचकांना विनंती आहे कृपया ही माहिती सर्वत्र शेअर करा जेणेकरून पुन्हा अशी वाईट घटना घडू नये.